Home विदर्भ बोथली येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी.!

बोथली येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी.!

29
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथली येथे शेतात तुरीच्या पेट्या जमा करीत असलेल्या मजुरावर रानडुकराने हल्ला केल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाला.
जखमी मजुरांचे नाव किसना चिंधुजी पारटकर वय 40 रा.टाकळी असे असून घटनेच्या दिवशी तो शेतामध्ये कापून असलेल्या तुरीच्या पेट्या जमा करण्याचे काम करीत होता,दरम्यान पेट्याच्या ढिगाऱ्यात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारार्थ वर्धेच्या सरकारी दवाखान्यात भरती करन्यात आले.घटनेची माहिती प्राप्त होताच झडशीचे क्षेत्र सहाय्यक के.एस. वाटकर , वनरक्षक बी. एस. आडे व मदतनीस एस. के. मुगले यांनी घटनास्थळ गाठून मौका पंचनामा केला आहे. जखमी झालेल्या शेतमजुरास वनविभागाकडून आर्थीक मदत मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Unlimited Reseller Hosting