Home महत्वाची बातमी पत्नीवर हतोड्याने वार करून पत्नी ची हत्या

पत्नीवर हतोड्याने वार करून पत्नी ची हत्या

14
0

एक मुलाला घेऊन पती फरार

अमीन शाह / अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १५ :- आपल्या पती वर जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नी वर पतीं ने हथोड्याने वार करून हुक ने मारून त्याची निर्घृण पणे हत्या केल्याची घटना आज औरंगाबाद येथे घडली असून या घटनेत पतीने आपल्या पत्नी वर लोखंडी हुक ने 100 वॉर करून त्याची आपल्या दोन मुलां समोर हत्या केली आहे , पती एक मुलाला सोबत घेऊन फरार झाला आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील अरुणादय कॉलनी परिसरात राहणारे राम बाबुराव काळे , 35 व त्यांची पत्नी जयशिरी काळे हे आपल्या दोन मुलांसह मोठ्या आनंदात राहत होते मात्र आज काही करणा वरून दोघात वाद झाला या वादात पती राम ने मृतक जय शिरी याच्या वर हथोड्या ने वार केला व तो ऐवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने आपल्या जवळ असलेल्या लोखंडी हुक ने एक नव्हे तर 100 वॉर करून आपल्या दोन्ही मुलांसमोर पत्नीस जागीच मारून टाकले , तो मोठ्या मुलास घेऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही या घटनेचा तपास चिकलठाणा पोलीस करीत आहे , परिसरात या घटने मुळे खळबळ उडाली आहे .