रवि गायकवाडऔरंगाबाद , दि.१४ :- रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय कार्यालय औरंगाबाद या मार्गे मातंग आक्रोश मोर्चाचे वतीने मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील नांदेड जिल्हातील बिलोली तालुक्यातील शंकरनगरच्या साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार,ग्राम मरोडा ता.अकोट,जि.अकोला येथे मातंग समाजातील विद्यार्थीनीवर गावातील चार गावगुंड नराधमांचा सामुहिक अत्याचार,अंधारी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद येथिल मातंग समाजातील महिलेला जाळुन मारले या विषयांवर मातंग क्रांती मोर्चाचे आयोजन कराण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व प्रकरणावर सरकारने गुन्हे हे फास्ट ट्रेक वर चालवुन गुन्हेगारांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी.प्रमुख मागण्या लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा.मुंबईच्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.मुंबईच्या ठिकाणी लो.अण्णाभाऊ साठे यांचे मोठ्या प्रमाणात स्मारक उभारावे.या मागण्या संबधित क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयावर निवेदन सह मातंग मोर्चा काढण्यात आला.मातंग आक्रोश मोर्चाचे प्रसंगी औरंगाबाद जिल्हा,पुणे जिल्हा,जालना जिल्हा,अहमदनगर जिल्हा सह सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.