Home विदर्भ बोर्डी येथे खुलेआम रेती चोरीला , “याला नेमके अभय कूनाचे”

बोर्डी येथे खुलेआम रेती चोरीला , “याला नेमके अभय कूनाचे”

175

देवानंद खिरकरअकोला / अकोट , दि. १४ :- अकोट तहसिल अंतर्गत ग्राम बोर्डी येथिल बोर्डी ते रामापूर रोडला लागून असलेला घोगा नाल्यामधुन गेल्या एक महिना पासून सतत दररोज रात्री व पहाटे सकाळी तिन ट्रक्टर धारक खुलेआंम अवैद्य रेतीची चोरी करीत आहेत.या बाबत मात्र महसूल विभागचे कर्मचारीयांना पुर्णपणे माहीती असुन सुध्दा ,,मुंगी बनून साखर खात आहेत,,घोगानाल्या मधे मागिल वर्षी पाणी अडवा पाणी जिरवा पाणी फाऊडेशन या योजने मार्फत मोठे मोठे गड्डे जे सी बी द्वारे खोदण्यात आले आहेत.तरी या वर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे त्या गड्डेमधे मोठ्या प्रमाणात रेती वाहुन आलेली आहे.तरी कुठलीही पर्मिशन किवा कुठलीही रायल्टी नसतांना बोर्डी व शिवपूर येथिल तिन ट्रक्टर धारक हे खूलेआम रेतिची वाहतुक करीत आहेत.बोर्डी व रामापूर गावात रेती टाकत आहेत.या बाबत आज परंत सुध्दा सबंधीत महसूल विभाग अकोट यांनी बोर्डी व शिवपुर येथिल एकही ट्रक्टर पकडून कारवाई करण्यात आलेली नाही.ही उल्लेखनिय बाब आहे.तरी याकडे जिल्हाधिकारी,जिल्हाखनिकर्म अधिकारी अकोला यांनी लक्ष देवुन महसूल विभाग अकोट यांना कारवाईचे आदेश देने गरजेचे आहे.कारण शासनाचा लाखो रुपये किमतीचा महसूल बुडत आहे.