Home मराठवाडा संपूर्ण गाव ग्रामीण डाक जीवन विमा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठीचं होय -/एस. टी....

संपूर्ण गाव ग्रामीण डाक जीवन विमा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठीचं होय -/एस. टी. सिंगेवार

44
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / भिसी इस्लापुर दि. १४ :- रोजी भिसी पोस्ट ऑफिस अंतर्गत आनंदनगर येथे मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत व डाक निरीक्षक किनवट श्री.आभिनव सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्रामीण डाक जीवन विमा योजना शंभर टक्के पूर्ण करण्याची जवाबदारी मार्केटिंग एक्सिकेटीव्ह मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड श्री.सुरेश सिंगेवार यांना देण्यात आली होती.

आज मु.आनंदनगर भिसी बीओ येथे आज गावातील नागरिकांना माहिती देताना सुरेश सिंगेवार म्हणाले की आपले गाव संपूर्ण ग्रामीण डाक जीवन विमा योजना करण्यासाठी डाक विभाग आपल्या गावांची निवड केल्याने यामुळे महिलांचा सर्वागीन विकास होते.डाक विमा घेतल्याने पैसे बचत होते आणि आपला विमा असतो आपल्याला कांही झाल्यास आपल्या वारसाला विमा अधिक बोनस सहित पैसे मिळतात ग्रामीण डाक जीवन विमा योजना एवढे कोणत्याही योजनेत एवढा पैसा इतर विमा कंपन्या देऊ शकत नाहीत.कारण डाक जीवन विमा योजना मध्ये एजनट नसल्याने सरळ लाभ विमा धारकाला मिळतो. असे सिंगेवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले हा कार्यक्रम शाखा डाकपाल भिसी श्री.डी.एस.नूनेवार यांनी आयोजित केला होता.
पुढे बोलताना सुरेश सिंगेवार म्हणाले की ग्रामीण भागातील महिला हे आपले घर लेकरे संभाळून देखील पुरुषाच्या बरोबरीने मजुरीने काम करतात पण बचतीची सवय नाही त्यांना बचतीची सवय लागावी म्हणून डाक विभागाने नांदेड जिल्ह्यातील शंभर गावे संपूर्ण ग्रामीण डाक जीवन योजना करण्याचे ठरवले आहे.
या संपूर्ण डाक जीवन विमा योजना ला ग्राम पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत आहे असे सिंगेवार यांनी सांगितले.
या आनंद नगर येथील सर्व नागरिक मोलमजुरी करणारे व दगड फोडणारे मजुरदार लोकांची वस्ती आहे.
आज हे आनंदनगर संपूर्ण गावातील प्रत्येक घरी एक ग्रामीण डाक जीवन विमा योजना पॉलिशी घेतलयाने हे गाव शंभर टक्के ग्रामीण डाक विमा झाल्याचे सिंगेवार यांनी सांगितले आहे.
हे गाव संपूर्ण ग्रामीण डाक जीवन विमा करण्यासाठी रवी वाडीकर , संजय राठोड , संकेत सिंगेवार, सुधाकर जाधव, श्रीकांत चव्हाण यांनी परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर नूनेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधारक जाधव यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting