मराठवाडा

म्हशी चोरणारी आंतर जिल्हा टोळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात….!!

Advertisements

अब्दुल कय्युम

औरंंगाबाद , दि. १३ :- ग्रामीण भागात जावून म्हशी चोरणारी आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. या प्रकरणी कन्नड तालुक्यातील डोंगरगावातील उत्तम आग्रे आणि सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जावेद पठाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्या नंतर ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बालाजी दादाराव भोसले, मारोती दुर्गाजी भोसले, शिवाजी दुर्गाजी भोसले, बबन मारोती भोसले , तान्हाजी दुर्गाजी भोसले (सर्व रा. बालाजी नगर जुने पडेगाव रोड परभणी), कैलास नामदेव हरगांवकर रा. सावतामाळी नगर, अर्धापूर, जि. नांदेड, सय्यद पाशा सय्यद रशिद रा. आनंदनगर, परभणी यांना या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. या टोळीने जळगाव, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही टोळी दिवसा गावाच्या परिसरात भाजी आणि भांडे विक्रीचा व्यवसाय करत असे. त्याच काळात म्हशीची रेकी करुन त्यांना रात्री आयशर गाडीत टाकून पळवून नेत. विशेष म्हणजे या टोळीतील अनेक सदस्य एकाच क़ुटुंबातील आहे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सुधाकर दौड, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, नामदेव शिरसाठ, धीरज जाधव, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...