मराठवाडा

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक ,  “संस्थाचालकांची शुक्रवारी नांदेड येथे बैठक”

Advertisements

नांदेड , दि. 13 ( राजेश भांगे ) :- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 याविषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संस्थाचालक, सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि परीक्षा केंद्र संचालक (दहावी, बारावी परीक्षा) यांची बैठक शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियमजवळ नांदेड येथे शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड हे उपस्थित राहून दहावी व बारावी परीक्षा 2020 बाबत मार्गदर्शक सुचना देणार आहे. तसेच बैठकीत बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 याविषयीही चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व संस्थांचालक अध्यक्ष, सचिव, सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि परीक्षा केंद्रसंचालक (एसएससी व एसएससी परीक्षा) यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा/मा) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...