विदर्भ

व्हॅलेंटाईन डे मातृ पितृपूजन दिन म्हणून साजरा करा

Advertisements

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. १३ :- व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा महाविद्यालय मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्याविषयी गुरुवारी ठाणेदार व कोरपना येथील शाळा महाविद्यालय मुख्यध्यापक यांना निवेदन देण्यात आले.

हिंदू जनजागृती समिती कोरपणा कडून ठाणेदार पोलीस स्टेशन कोरपणा, प्राचार्य
कला महाविद्यालय कोरपना, वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना, शासकीय आयटीआय कोरपना,हरिभाऊ डोहे विद्यालय कोरपना ,भाऊराव पाटील चटप शाळा कोरपना याठिकाणी प्राचार्य, शिक्षकांसोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची प्रथा भारतात रूढ झाली आहे पाश्चात्त्य कृप्रथा आणि व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे सादरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलीचे छेडछाड आणि हिंसक कृत्य घडल्या आहेत. तसेच या दिवशी होणाऱ्या मेजवानीत, मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थाचे सेवन संतती प्रतिबंधक साधनांचा विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणात वाढ, अनैतिक संबंधातील वृद्धी दर्शविते
तसेच या दिवशी मुलीवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहन चालवण्याचे अपघात होतात. त्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडणारी स्वैराचाराची आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.
असे मत हिंदू जनजागृती समितीने या निवेदनाद्वारे मांडले. निवेदन देतेवेळी दिनेश राठोड, अतुल आसेकर, सतीश गज्जलवार महेंद्र कोमावार, कोंगरे, दरवडे, विनेश पडगिलवार उपस्थित होते.

You may also like

विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...
विदर्भ

आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी रोगाचा प्रकोप , “लस सह डॉक्टर उपलब्ध नाही”

अकोला – पातुर तालुक्यातील आलेगाव येथे प्राण्यांवर लम्पी आजाराचा प्रकोप वाढला असून आलेगाव पशु रुग्णालयात ...