Home यवतमाळ पारवा जि.प.कन्या शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती..

पारवा जि.प.कन्या शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती..

254

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पारवा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला जेष्ठ माता पालक पुष्पाबाई कुत्तरमारे, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येकाला विद्या प्राप्तीचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राची दारे सर्वासाठी खुली केली. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी क्रांतीची ज्योत पेटविली. स्वतंत्रपणे स्त्रियासाठी शाळा काढणारे महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले भारतीय होते.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना “महात्मा”ही उपाधी दिल्याचे मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी आपल्या मनोगतातून विध्यार्थिनींना संबोधित केले. तर स्त्री यांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, अनिष्ठ चालीरिती, समाजप्रबोधन, सामाजिक असमतोल नसावा, सर्वधर्म समभाव अशा विचारांची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले एक असामान्य विचारवंत, समाजसुधारक होऊन गेले.”चूल आणि मूल” या चौकटीत स्त्रियांना न ठेवता तिला स्वतंत्र करण्यासाठी खूप त्रास सहन केला अश्या ज्योतिबा फुलेमुळे आज महिला शिक्षित होऊन महत्वाच्या स्थानावर कार्य करत आहेत. ज्योतिबा एक क्रांतिसूर्य होऊन गेले. आपल्या कर्तृत्वाचा विचार समाजाला दिशा देवून गेले असे आपल्या मार्गदर्शनातून सहाय्यक शिक्षक प्रशांत भेदूरकर यांनी विषद केले. यावेळी जेष्ठ माता पालक पुष्पाबाई कुत्तरमारे काकू,भवरे काकू, यांचे सह पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. शिक्षक भेदूरकर यांनी केले तर सांगता मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी केली.