Home बुलडाणा पोलिस भरती साठी पुन्याला गेलेल्या युवकाचा धावतांना दुर्देवी मृत्यु ,

पोलिस भरती साठी पुन्याला गेलेल्या युवकाचा धावतांना दुर्देवी मृत्यु ,

129

 

अमिन शाह

अंगावर खाकी वर्दी चढवून आई-
वडिलांच्या कष्टाचे पांग फेडण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो धावत होता… पाऊल वेगाने पडत होती आणि डोळ्यांसमोर फक्त ध्येय होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तलुक्यातील चिंचोली येथील २३ वर्षीय पुरुषोत्तम बुरकुल या तरुणाचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळची वेळ नेहमीसारखीच उत्साहाची होती. पुरुषोत्तमने पहिल्या दोन फेऱ्या अत्यंत जिद्दीने पूर्ण केल्या. तिसऱ्या फेरीत मात्र अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आला आणि तो जमिनीवर कोसळला. सोबत धावणाऱ्या उमेदवारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तातडीने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

पुरुषोत्तम हा देऊळगाव राजा तलुक्यातील चिंचोली येथील एका सामान्य कुटुंबातील तरुण होता. पोलीस होऊन घराचा आधार बनायचे, या जिद्दीने तो गेल्या अनेक महिन्यांपासून सराव करत होता. त्याच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे.

पुरुषोत्तम आता कधीच परतणार नाही, या कल्पनेने त्याच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत.

प्रशासनाकडून हळहळ व्यक्त

भरती प्रक्रियेतील कठीण मानली जाणारी १६०० मीटरची चाचणी पुरुषोत्तमसाठी जीवघेणी ठरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नशिबाने साथ दिली नाही. एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुरुषोत्तमचा मृत्यू ही केवळ एका उमेदवाराची एक्झिट नाही, तर एका स्वप्नाचा झालेला