Home बुलडाणा बसमध्ये महिलेची पर्स चोरी आरोपी महिला अटकेत, मुद्देमाल जप्त

बसमध्ये महिलेची पर्स चोरी आरोपी महिला अटकेत, मुद्देमाल जप्त

177

बसमध्ये महिलेची पर्स चोरी आरोपी महिला अटकेत, मुद्देमाल जप्त

 

खामगाव :- बस मध्ये प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना आज खामगांव येथे समोर आली. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी महिलेचा शोध घेत तिला अटक केली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,एका महिलेच्या पर्समधून सुमारे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आयरिंग व रोख रक्कम असा एकूण सुमारे 60,700 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने जलद हालचाल करत गुन्ह्याचा छडा लावला.
ही कारवाई पो नि रामकृष्ण पवार, पोलीस निरीक्षक पोस्टे खामगांव शहर, यांचे आदेशाने स.पो.नि. विकास पाटील, पोहेकों प्रदीप मोठे.ब.नं.११११, पोहेकों सागर भगत, व.नं.२४२०, पोहेकॉ. भिमराव वानखेडे,व.नं.२०६२.पो.कॉ रविंद्र कन्नर.ब.नं.२२९५.पो.कॉ. गणेश कोल्हे.ब.नं.४४, पो. कॉ. राहुल धारकर, व.नं.१७२०, पो.कॉ. अंकुश गुरुदेव, ब.नं. ७६०, पो.कॉ. निशांतकुमार कळसकार, ब. नं. २५३४, महीला पोकों दिव्या काळे, यांनी केली आहे. सदर गुन्हयामध्ये चिखली पोलीस स्टेशनचे पोकों अमोल गवई, मपोकों रुपाली उगले यांनी सुध्दा आरोपीचा शोध घेण्यासाठी मदत केली आहे