Home यवतमाळ बोरी अरब येथील हरियाणा जेलेबी वर अवैध रित्या गॅस सिलेंडर वर पुरवठा...

बोरी अरब येथील हरियाणा जेलेबी वर अवैध रित्या गॅस सिलेंडर वर पुरवठा विभाग कडून धाड…!

855

दारव्हा  – आज मंगळवाररोजी बोरी अरब येथील शिवाजी महाराज चौक येथील अवैध रित्या वापरण्यात येत असलेल्या गॅस सिलेंडर चा दारव्हा तहसील पुरवठा विभाग कडून पर्दा पाश करण्यात आला.

सध्या सुरू असलेल्या गॅस सिलेंडर तुटवड्या बद्दल पुरवठा विभाग सक्रिय असून अनेक ठिकाणी धाडी सत्र सुरू आहे.
या मध्ये बोरी अरब अनेक ठिकाणी धाडी टाकत असून बाकी व्यावसायिक सतर्क झाले आहे.
परंतु शहरात अनेक व्यावसायिक उपास मारी ची वेळ येऊ नये म्हणून आधीच व्यावसायिक यांनी उपाय योजना करून ठेवली आहे.
आज अचानक पणे भर चौकात धाड टाकल्याने पक्षा पुढारी समोर आले परंतु धाडी मुळे पक्षा चे पुढारी यांची सुद्धा बत्ती गूल झाल्याचा पाहण्यास मिळाले. या वेळी पुरवठा निरीक्षण तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनास दीपक मनवर, प्रियंका येलवाड, पुनम धावडे, महेश घोददाम, निलेश सींगाडे, इत्यादी हजर राहून हि कार्यवाही करण्यात आली. सदर गॅस सिलेंडर जप्त करून काही दंड सुद्धा थोपाटण्यात आला.