Home यवतमाळ यवतमाळच्या जिमल फातेमा हिने अल्लाहची इबादत करत 26 रोजा ( उपवास )...

यवतमाळच्या जिमल फातेमा हिने अल्लाहची इबादत करत 26 रोजा ( उपवास ) केले पूर्ण…!

361
यवतमाळ – यवतमाळ शहरातील रा.- कोहिनूर सोसायटी, पांढरकवडा रोड, यवतमाळ येथील जिमल फातेमा अतीक जावेद शेख ( वय 5 वर्ष ) हिने सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यात 26 रोजा ( उपवास ) पूर्ण करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
आपल्या परिवारातील इतरांप्रमाणे हिने इतक्या लहान वयात श्रद्धा, संयम आणि धार्मिक परंपरेबद्दलची निष्ठा दाखवत मुस्लिम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात नियमितपणे रोजा ठेवला. कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली जिमल फातेमा हिने अल्लाहची इबादत करत 26 रोजा पूर्ण केले.
तिच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नातेवाईक, मित्र-परिवार व परिसरातील नागरिक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एवढ्या कमी वयात धार्मिक परंपरेचे पालन करून जिमल फातेमा हिने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.