Home यवतमाळ कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

414

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून.

वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी इचोड शिवारातील घटना

राळेगाव –  कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी इचोड शिवारात उघडकीस आली.
याप्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

वैजयंतीमाला श्रीनिवास येलके (४५) रा .बोरी इचोड,असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर श्रीनिवास येलके (५०) रा.बोरी इचोड असे आरोपी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वैजयंतीमाला व श्रीनिवास या पती – पत्नीचे घरगुती कारणावरून नेहमी वाद व्हायचे.
शनिवारी दुपारच्या दरम्यान वैजयंतीमाला व श्रीनिवास हे दोघे पती-पत्नी आपल्या मालकीच्या शेतात तुरी ठोकायला गेले होते. पत्नी तुरी ठोकत असताना
पतीने नेहमीच्या वादातून व अपमानातून सुटका मिळावी म्हणून पती श्रीनिवासने
कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पत्नीचा खून करून आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून श्रीनिवासने पत्नीचा मृतदेह शेतातच तुरीच्या गंजीमध्ये लपून ठेवला व आरोपी श्रीनिवास फरार झाला.
मात्र पोलिसांनी काही तासातच आरोपी पतीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली.व या प्रकरणाचा उलगडा झाला.

घटनास्थळी वडकी पोलिसांनी भेट दिली व फॉरेन्सिक लॅबला बोलवून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता राळेगाव येथे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे हे करीत आहे.

सोबत फोटो मृतक पत्नी व पती आरोपी यांचा