Home वाशिम मंगरुळपीर शहरात महिला असुरक्षित: ट्युशनला जातांना ‘तीची’ छेड काढली अन् पुढे गळफासाचा...

मंगरुळपीर शहरात महिला असुरक्षित: ट्युशनला जातांना ‘तीची’ छेड काढली अन् पुढे गळफासाचा प्रयत्न…..!

204

 

शाळा, महाविद्यालय परिसरात दररोज घडताहेत मुलींच्या छेडछाडीचे प्रकार

फुलचंद भगत
वाशिम:-ट्युशनला जातांना मंगरुळपीर शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या तक्रारीवरुन सबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण हे प्रकरण नुसते छेड काढन्यापुरते नाही तर ‘कहानी कुछ और है’ चा संशय येत असल्याने पोलिसांनी गंभीरतेने घेवुन तपास करावा व दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
मंगरुळपीर शहरात शाळा, महाविद्यालयांतील मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयांचे परिसर छेडछाडीचे अड्डे झाले आहेत. मात्र, टवाळखोरांवर कारवाईसाठी नियुक्त निर्भया पथकाकडे एखादीच तक्रार येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालकांचा दबाव आणि बदनामीला घाबरून मुली पोलिसांकडे जात नाहीत, असेही निदर्शनास आलेे. त्यामुळे टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले ऊचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.

एकीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. दुसरीकडे सामाजिक दबावामुळे त्या तक्रारी करण्यापासून मागे हटत आहेत. अशा स्थितीत त्यांना टवाळखोरांचा प्रतिकार करण्यासाठी पोलिस शाळा आणी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

मंगरुळपीर शहरात हप्ताभरापुर्वी पूर्वी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अशा घटना दररोज शाळा काॅलेज,ट्युशन परिसरात घडत असल्याचे चिञ आहे.या घटनांची प्रशासकीय पातळीवर गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात छेडछाडीचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

*निर्भया पथक सक्रीय करण्याची आवश्यकता*
मुलींची छेडछाड आणी महिलांविषय तक्रारी निवारण्यासाठी निर्भया पथक असल्याचे सांगण्यात आले तरीही रोज कुठे ना कुठे शहरात मुलींची टवाळखोर छेड काढतांना दिसतात.असे असतांना निर्भया पथक कुठे असते असा प्रश्न शहरवाशीयांना पडत आहे.छेडछाडीचे रुपांतर पुढे मोठ्या घटनेत होवु शकते त्यामुळे पोलिस विभागाने दामीनी पथक नुसते कागदावरच न ठेवता महिला सुरक्षेसाठी सक्रीय करावे अशी मागणी होत आहे.