Home वाशिम वाशिम जिल्ह्यात सामुहिक काॅपिचा प्रकार ऊघड 26 शिक्षक निलंबित ,

वाशिम जिल्ह्यात सामुहिक काॅपिचा प्रकार ऊघड 26 शिक्षक निलंबित ,

216

वाशिम जिल्ह्यात सामुहिक काॅपिचा प्रकार ऊघड

बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत कॉपीमुक्तीचा फज्जा

श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालातील प्रकार

26 शिक्षक निलंबित ,

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्हातील केंद्र क्रमांक ०९०६ श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामुदायिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाच्या अचानक भेटीत तसेच तपासणीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले होते या प्रकरणी आज 26 कर्मचारयाना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे ,

दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता भरारी पथकाने परीक्षा केंद्राची पाहणी केली. या केंद्रावर एकूण ५८४ विद्यार्थ्यांची नोंदणी असून ५८१ विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरी प्रकाशयोजना, पंखे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण केंद्रात केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते.विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे आढळून आले. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन/पेन्सिलने खूणा केल्याचेही आढळले.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही परीक्षा केंद्रास भेट दिली होती.भरारी पथकाच्या तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन परीक्षा केंद्रात फिरत असल्याचे आढळले. मोबाईल तपासणीस टाळाटाळ केल्यानंतर अखेर दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.बैठे पथकातील सदस्यांनीही आपल्या अहवालात उपस्थित ५८१ विद्यार्थ्यांनी सामुदायिक कॉपी केली आहे, असे नमूद केले आहे.भरारी पथकाचा अहवाल, उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि संबंधित कर्मचाऱ्याकडे आढळलेले मोबाईल यावरून केंद्र क्रमांक ०९०६ येथे सामुदायिक कॉपी झाल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकरणी शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता असुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

इथेच घडला हा गैर प्रकार ,