Home अमरावती जगदंब महाविद्यालयात रासेयोतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

जगदंब महाविद्यालयात रासेयोतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

153

अचलपूर :श्री जगदंब विणकर शिक्षण संस्था संचालित जगदंब महाविद्यालय, अचलपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युनिटच्या वतीने १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅली काढून भारताच्या विविधतेतील एकतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. भूमिका वानखडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोहळे तर मुख्य अतिथी म्हणून जगदंब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रजनी रमाकांतजी शेरकार उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्याम गायकवाड (इंग्रजी विभाग) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. पूजा बारब्दे (वाणिज्य विभाग) यांनी केले, तर संचालन कु. साक्षी कटारे यांनी केले.
प्रा. श्याम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या विचारांचे वाचन व आचरण करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भूमिका वानखडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमास डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. इमरान अली, प्रा. अभिजित पाखरे, डॉ. मोनिका दीक्षित, डॉ. प्रिती टवलारे, डॉ. तुलिका खडसे, डॉ. दौलत राऊत आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच रासेयो स्वयंसेवक शिवा बोके, आशिष पारवे, श्रृतिका कपिले, देवा डोईफोडे, गौरी सुरंजुसे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. निशा छापाने यांनी केले.