Home जळगाव मुस्लिम मंच चे ४४ व्या दिवशी उपोषण सुरूच , “हिंगणघाट प्रकरणी मृत...

मुस्लिम मंच चे ४४ व्या दिवशी उपोषण सुरूच , “हिंगणघाट प्रकरणी मृत फुलराणी हिस श्रद्धांजली”

158

शरीफ शेखजळगाव , दि. ११ :- मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी ४४ सावा दिवस सदर दिवस हिंगणघाट येथील घटनेतील फुलराणी तिचा मृत्यू झाल्याने सदर फुलराणी स श्रद्धांजली अर्पण करून हा निषेध नोंदविण्यात आला.हिंगणघाट प्रकरणाचा निषेध व आरोपीस फाशी ची मागणीमुस्लिम मंच व भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एनटीआर विरोध म्हणून सुरू असलेल्या ४४ व्या दिवशी हिंगणघाट येथील प्राध्यापिकेचे वर अमानुषपणे रॉकेल टाकून पेटवण्यात आले होते सदर शिक्षिका मृत्यूशी झुंज देत होती सोमवारी तिचा मृत्यू झाल्याने त्या फुलराणीला श्रद्धांजली अर्पण करून त्या नराधमास फाशीची शिक्षा त्वरित व्हावी ही एक मुखी मागणी घेऊन निषेध नोंदविण्यात आला.
तसेच वेगवेगळ्या घोषणा देऊन या घटनेचा त्रीव विरोध करण्यात आला यावेळी प्रतिभा शिंदे, फारुक शेख ,करीम सालार, गफ्फार मलिक ,प्राध्यापक डॉक्टर इक़बाल शाह,नगरसेवक इक़बाल पिरजादे, ताहेर शेख, तय्यब शेख, सलीम मोहम्मद, सचिन पाटील, चाळीसगाव चे अलाउद्दीन शेख, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संविधान जागर चे मुकुंद सपकाळे, यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधवांचा समावेश होता.*संविधान बचाव नागरी कृती समितीचा सहभाग*४४ व्या दिवशी जळगाव संविधान बचाव नागरिक कृती समितीचे पदाधिकारी यांनी उपोषणात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला यावेळी हिंगणघाट घटनेचा तसेच भारतात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे निर्मित करावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. काही राजकीय नेत्यांनी दगड व तलवारींचा उल्लेख करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या वक्त्यावयचा चाही निषेध करण्यात आला.*निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*४३ व्या व ४४ व्या दिवसाचे दोन निवेदन गफ्फार मलिक व करीम सालार यांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी रामदास कदम यांना देण्यात आले तेव्हा समितीचे फारुक शेख, आबिद खाटीक, इक़बाल पिरजादे ,फारूक अहेलेकर,अन्वर सिकलिगर, युसुफ शाह,साबिर शाह, खालील अहमद यांची उपस्थिती होती.