Home मराठवाडा मण्याड भूषण पुरस्कार तथा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

मण्याड भूषण पुरस्कार तथा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

288

नांदेड / कंधार , दि. ११ :- ( राजेश भांगे )
उस्माननगर येथे मन्याड भूषण पुरस्कार तथा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला , यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ स्वातंत्र्य सैनानि , शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी चे सचिव. ( शे.का.प.) माजी आ.भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोहा – कंधार चे लोकप्रिय ( शेतकरी कामगारा पक्षा चे ) आ. श्यामसुंदर शिंदे साहेब तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे हे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना आ. शिंदे आणि आशाताईंनी मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कार्यकर्ता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले यामध्ये आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या अडी अडचणी जाणून घेतल्या तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडविल्या,यावेळी कार्यक्रमास लक्ष्मीबाई घोरबांड (सभापती पं.स. कंधार) उपस्थित होते. या कार्यक्रमास पुरस्कर्ते भाई गुरुनाथराव कुरुडे , अशोक करंजकर (आय.ए.एस) , डॉ.ऋतुराज जाधव (न्युरोसर्जन यशोसाई हॉस्पिटल), जीवनराव पानपट्टे,संजय लाटकर (अतिरिक्त पोलिस महासंचालक झारखंड) प्रतिनिधी आनंद लाटकर, मारोतराव गायकवाड ( उच्च न्यायालय माजी न्यायाधीश तथा अध्यक्ष मागासवर्गीय आयोग) प्रतिनिधी अशोक पा. गायकवाड, एम.एम काजी (न्यायाधीश सोलापूर) ,सुप्रिया डांगे(उपजिल्हाधिकारी) प्रतिनिधी बालाजी डांगे(मा.सरपंच), शिवाभाऊ मामडे( सामाजिक कार्यकर्ता), रामेश्वर पांडागळे(मुख्याधिकारी), काशिनाथ डांगे (मा. तहसिलदार), माऊली सायाळकर (सामाजिक कार्यकर्ता), उत्तम पाटील (जलतरण पटू गोल्ड मेडल), रेखा काळम(बालविकास प्रकल्प अधिकारी), दत्तात्रय येमेकर (हरहुन्नरी शिक्षक) ललीताबाई चिखलीकर,श्याम पवार, बालाजी वैजाळे, राजू वडवळे, माधव घोरबांड, शिवराज शिंदे, पवन वाले, शंकर किरोडकर, सिद्धू वडजे अजीम शेख, शेख भाई, अवधूत पेटकर, मधुकर बाबर, मनोज भालेराव, अबू भाई, प्रसाद जाधव, अमोल गोरे, सतीश कराळे, उत्तम नांदगावकर, विश्वनाथ लोंढेसांगवी, प्रसाद शिंदे, श्यामसुंदर सावळे, सुधाकर सातपुते, नागेश हिलाल , बंटी गाडेकर, अशोक गायकवाड, सचिन कुदळकर, सदाशिव पवळे, अनिकेत पाटील तसेच पत्रकार बंधू , मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.