Home बुलडाणा हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकल चा अपघात साखरखेर्डा येथील दोन युवक जागीच ठार

हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकल चा अपघात साखरखेर्डा येथील दोन युवक जागीच ठार

805

 

शेख गुलशेर

दुसरबिड़ ,

मलकापूर पांगरा ते दुसरबीड रोडवर वरील हॉटेल सातबारा समृद्धि महा मार्ग जवळ आज रात्रि मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन या अपघातात साखरखेर्डा येथील दोन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार दुसरबिड येथे आज एक विवाह स्वागत समारम्भ कार्यक्रम होता या साठी साखरखेर्डा येथील शेख आरिफ शेख कादर वय 35 वर्ष वार्ड क्रमांक 4 शेख अल्ताफ शेख अक्रम वय 22 वर्ष राहणार साखरखेर्डा हे दोघे आपले मोटरसायकल क्रमांक mh28 बीजे 40 29 ने साखरखेर्डावरून दुसर बीड येथे रिसेप्शन कार्यक्रमासाठी जात असताना दुसर बीड येथील हॉटेल सातबारा समोर रिंग रोडचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असलेली मोटर सायकिल रिंग रोडला धडकली झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून हॉटेल सातबारा समोर समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजसाठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे कोणतंच फलक दर्शवणारा नसल्याने व त्यांना रिंग रोडचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे सदर दोन्ही व्यक्ती साखरखेर्डा येथील एकाच परिवारतील असून घटनेची माहिती साखरखेर्डा येथे पहोचताच सर्वत्र शोककला पसरली सदर अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दखल करण्यात आला नसून दोन्ही व्यक्तींना किनगाव राजा पोलिसांनी पीएम साठी सिदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात नेले आहे ,

 

 

 

 

 

शेख अल्ताफ

मोटर सायकल