Home विदर्भ “सौं. चंदा अग्रवाल”, समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व….!

“सौं. चंदा अग्रवाल”, समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व….!

334

वर्धा / आर्वी : समाजसेवा, जनसंपर्क आणि लोकहिताच्या कार्यात आघाडीवर असलेले नाव म्हणजे सौं. चंदा अग्रवाल. मागील अनेक वर्षांपासून त्या विविध सामाजिक उपक्रमांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. समाजातील दुर्बल घटक, गरजवंत महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देत, त्या नेहमीच ‘गरजवंतांसाठी धावून येणारी महिला’ म्हणून ओळखल्या जातात.

आगामी आर्वी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सौं. चंदा अग्रवाल यांनी उमेदवारी जाहीर केली असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्पष्ट दृष्टीकोन मांडला आहे.

चंदा अग्रवाल म्हणतात, “जेव्हा एक महिला देश सांभाळू शकते, तेव्हा मी माझे शहर, माझी आर्वी का नाही?” — या विचारातून त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेवरील विश्वास स्पष्ट दिसून येतो.

त्यांना राजकारणाची प्रेरणा माहेरघरातूनच मिळाली आहे. बालपणापासूनच समाजकार्यात रस असलेल्या चंदाताईंनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. महिलांसाठी स्वावलंबनाचे विविध उपक्रम, पर्यावरण संवर्धन मोहिमा आणि शैक्षणिक सहाय्य या क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.

आर्वी शहराच्या विकासासाठी त्यांची भूमिका ठाम आहे — शहर स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.

सौं. चंदा अग्रवाल यांच्या या सामाजिक कार्यामुळे आणि स्पष्ट दृष्टीकोनामुळे नागरिकांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. अनेकांचा विश्वास आहे की, त्यांच्यासारख्या कार्यक्षम आणि संवेदनशील नेत्यामुळे आर्वी शहराचा विकास अधिक गतीने होईल.