Home ठाणे आहो आश्चर्य दोन वर्षाच्या मुलीवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल ,

आहो आश्चर्य दोन वर्षाच्या मुलीवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल ,

502

 

पोलिसवाला टीम ,

ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी अवघ्या दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याण मोहने परिसरात गावगुंडांनी लहुजी नगर परिसरात दगडफेक करत लाठ्या-काठ्यांनी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
कल्याण मोहने परिसरात गावगुंडांनी लहुजी नगर परिसरात दगडफेक करत लाठ्या-काठ्यांनी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
याच प्रकरणात पोलिसांनी 2 वर्षाच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्रयत्न करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत दोन वर्षांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे वकिलाने न्यायाधीशाच्या निदर्शनास आणून दिल्याने तपसा अधिकाऱ्यांची बोबडी वळली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन वर्षांच्या चिमुरडीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल?

झालेल्या कार्यवाही मुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कल्याण मोहने परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीच्या प्रकरणाला आता अजब वळण मिळालं आहे. या घटनेत पोलिसांनी 25 ते 30 जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल केले असताना, या यादीत केवळ 2 वर्षांच्या चिमुरडीचं नाव असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे.