
सिंदखेड़राजा तालुक्यात प्रशासना मुळे शेतकर्यांची दिवाळी गेली आंधारात ,
अमिन शाह
बुलडाणा ,
गेल्या महिन्यात सिंदखेड़राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता यात तालुक्यातील अनेक शेतकरयांचे सोयाबीन व इतर पिक वाहुन गेले होते मोठ्या प्रमाणावर वर अतिव्रुष्टि झाली होती याचे अहवाल तलाठी मण्डल अधिकारी यांनी तय्यार करून तहसीलदार यांना पाठवले होते त्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व
बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटिल यांनी विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित करून दीवाळी पूर्वीच अतीव्रुषटी ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बैंक खात्यात मदत जमा केली जाईल व त्यांची दिवाळी गोड केली जाईल अशी मोठी घोषणा केली होती या साठी दोन दिवस सिंखेड़राजा तहसील कार्यालयातिल काम काज ही बंद करण्यात आला होता मात्र दुर्देव एवढा दिखावा करून ही आज अनेक शेतकरी बाँकेच्या चकरा मारत आहे सरकार कडून मिळणारी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा होउ शकलेली नाही ,
हातात आलेलं सोयाबीनचं पीक अतिवृष्टीच्या तडाक्यात जमीनदोस्त झालं आणि त्यामुळे दिवाळीत आपल्या मुलाबाळांना नवीन कपडे घेणार, माझ्या घरी आलेल्या बहिणीला साडी आणि भाच्यांना कपडे घेणार हें स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न भंगल, आता सरकारने अतिवृष्टी जाहीर करून जें शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं पैकेज जाहीर केलं ते तरी दिवाळी पूर्वी वेळेवर मिळेल या आशेने शेतकरी दररोज बैंकेत जाऊन आपलं खातं तपासत आहे, पण हें नतभ्रष्ट महायुतीचं सरकार दिवाळीच्या सनासूंदीच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा करतं आहे, नव्हे त्यांना आत्महत्त्या करण्यास जणू प्रवृत्त करतं आहे, शोकांतिका म्हणजे सोयाबीनचं जें पीक करपलं आणि एकरी एक दोन क्विंटल झालं ते बाजारात नेलं तर त्याचा भाव दोन ते अडीच हजार क्विंटल मिळतंय मग शेतकऱ्यांनी करावं तरी काय? या विवंचनेत तालुक्यातील सिन्दी येथील एका शेतकऱ्यांने आत्महत्त्या केली, खरं तर ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्त्या आहे मग हाच काय कृषिप्रधान देश ज्या देशात शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागताय आणि सरकार बघ्याची भूमिका घेताहेत.
एकीकडे उद्योगपती, व्यापारी, कर्मचारी आपल्या घरी दिव्याच्या रोशनाई करताहेत पण दुसरीकडे सोयाबीन मातीत गेल्या मुळे घरी तेलाचा दिवा लावायला सुद्धा पैसे नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, हें दुर्भाग्य शेतकऱ्यांच्याच वाट्याला का? असा प्रश्न पडतो, जो शेतकरी शेतात राब राब राबतो आणि एका दाण्याचे शंभर दाने करतो पण त्याच्या वाट्याला अस्मानी सुलतानी संकट आलं की त्याला सरकार वेळेवर मदत करतं नाही मग हेच का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालणार महायुती सरकार? माझ्या शेतकऱ्यांच्या शेतातील शेतपिकांच्या देठाला सुद्धा हात लावला तर त्यांचे हात कलम केले जाईल असा आदेश देणाऱ्या छत्रपतींच्या राज्यात त्यांच्याच नावाने केलेली कर्जमाफी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना मिळतं नाही, मग हें सरकार कुठलं सरकार आहे? शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असतांना सरकारी इमारती मात्र रोशनाईने लखलखत आहे मग यालाच शिवाशाही म्हणायची का? असा प्रश्न पडतो.. आज ही अनेक शेतकरी मदतीसाठी बैंकेच्या व तलाठी कार्यालय च्या चकरा मारत आहे बैंक वाल्याला विचारना केली तर वरुण पेशे आले नाही आम्ही कुठून द्यावे तलाठी साहेबाला विचारना केली तर आम्ही सर्व यादया अपलोड केल्या आहेत आमच्या हातात काही नाही असे उत्तर मिळते , या मुळे सिंदखेड़राजा तालुक्यातील शेतकरयांची दिवाळी व भाऊबीज अंधारात गेली आहे ,











































