Home महत्वाची बातमी पोलिस कर्मचारयास मारहाण करणाऱ्या ससराईत गुंडाचि पोलिसांनी काढली धिंड ,

पोलिस कर्मचारयास मारहाण करणाऱ्या ससराईत गुंडाचि पोलिसांनी काढली धिंड ,

483

 

अमिन शाह
पातुर जी ,अकोला ग्राम शिरला येथिल अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुंडा चि आज दुपारी 4 वाजता धिंड काढण्यात आली असून या घटनेमुळे शहरातील तसेच तालुक्यातील गुंडागर्दी करणाऱ्या भाऊ, दादा यांना एकच धडकी भरली आहे शिरला येथिल सराईत गुन्हेगार असलेल्या शिवम उर्फ शिवा निलखन याने सोमवारी पहाटे एका युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण केली होती याबाबत पातूर पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवत घटनास्थळ गाठले असता पोलीस कर्मचारी वासिमोद्दीन इस्लामोद्दीन यांचे वर आरोपी शिवा निलखन याने हल्ला चढवून पोलीस कर्मचारी यास जखमी केले होते या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दखल घेत आज दुपारी 4 वाजता चे दरम्यान शहरातून आरोपी शिवा निलखन याची धिंड काढली यावेळी ठाणेदार हणमंत डोपेवाड, सहा. ठाणेदार गजानन तडसे, सहा. ठाणेदार रमेश खंडारे पो. हे कॉ. वसीम मेजर, सचिन नवले आदी. उपस्थित होते ,