Home बुलडाणा साखरखेर्डा ग्रामपंचायत कडून ऐतेहासिक जामा मस्जिद समोरच्या तलावात येणाऱ्या पाण्याच्या मार्गाची सफाई...

साखरखेर्डा ग्रामपंचायत कडून ऐतेहासिक जामा मस्जिद समोरच्या तलावात येणाऱ्या पाण्याच्या मार्गाची सफाई ,

422

 

अनेक वर्षां नंतर पाण्याचा मार्ग मोकळा ,

पर्यावरण प्रेमीत आनंदाचे वातावरण ,

अमीन शाह

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा हा गाव ऐतेहसिक म्हणून ओळखला जातो येथे सैकडो वर्षा पूर्वीचे मंदिर मस्जिद किल्ला कमानी बारव असून येथे संपूर्ण काळ्या दगडाने बांधण्यात आलेली एक सुंदर आकर्षक जामा मस्जिद आहे आणि या मस्जिद समोरच त्या काळी बांधण्यात आलेला एक पुरातन जुना तलाव आहे या तलावात पूर्वीच्या काळा पासून गोरेगाव फाटा हजरत अनामत खान शहीद बाबा दर्गा येथून पाणी येत होता मात्र हळू हळू गावाचा शहरिकरण झालं व पाण्याचा प्रवाह जिथून होता तेथे काही लोकांनी घरे बांधली समोरच असलेला राज्य मार्ग ही मोठं झालं त्या मुळे गेल्या काही वर्षां पासून या ऐतेहासिक तलावात पाणी येणे बंद झाले होते पाणी येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले होते परिणामी गावाची शान वैभव असलेला ऐतिहासिक तलाव कोरडा ठण पडला होता पूर्वीच्या काळात मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यासाठी येणारे लोक या तलावाच्या पाण्याने वजू करत होते पाणी टंचाई च्या काळात ही गावकऱ्यांसाठी हा तलाव फार उपयोगी ठरत होता गेल्या अनेक वर्षा पासून येथील पर्यावरण प्रेमी व पत्रकारांनी तळ्यात येणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा यासाठी ग्राम पंचायत कडे अनेक वेळा मागणी केली होती मध्यंतरी येथील माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी यांनी या तलावात पाणी आणण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा केली होती व या ऐतेहसिक तलावाची जे सी बी व्दारे साफ सफाई केली होती मात्र त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला तेव्हा ही तलावात येणाऱ्या पाण्याचा मार्ग बंदच होता त्या मुळे मुसळधार पाऊस होऊन ही हा तलाव कोरडाच होता त्यात पाणी येत नवहते ही बाब गावातील काही पर्यावरण प्रेमींनी येथील कर्तवयदक्ष सरपंच अमित रामभाऊ जाधव यांना सांगितली त्यांनी तात्काळ याची दखल घेत जे सी बी व्दारे तलावात येणाऱ्या पाण्याची वाट मोकळी केली व कामगार लावून तलावात पाणी कसे येईल या साठी नाल्याची साफ सफाई केली आता या पुरातन तळ्यात पाणी येणार आहे या वेळी ग्रामपंचायत चे उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते ,

कचऱ्याची समस्या ,

पोस्ट ऑफिस च्या संरक्षण भीती जवळ काही लोक या ऐतेहासिक तलावात केर कचरा आणून टाकत आहे तलावात कचरा फेकणे तात्काळ बंद करण्यात यावे तलावात टाकण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी येथील पर्यावरण प्रेमींनी ग्रामपंचायती कडे केली आहे ,