Home यवतमाळ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्कूल ऑफ स्काँलर्सचा समर्थ अविनाश मसराम अव्वल

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्कूल ऑफ स्काँलर्सचा समर्थ अविनाश मसराम अव्वल

192

YAVATMAl – स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा क्रीडा परीषद यवतमाळ तसेच क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आयोजित १४ वर्षाआतील जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा दिनांक ७ आँगस्ट २०२५ राेजी मारेगाव येथे प्रथमच संपन्न झाल्या.

या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील अव्वल ५ खेळाडूंची मूला – मूलिचि निवड करण्यात आली होती. शासनाद्वारे आयोजित या स्पर्धेली विषेश महत्त्व असते. १४,१७ १९ वर्षाआतील तालुकास्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच यवतमाळ येथे पार पडली. मारेगाव दिनांक ६ ते ७ आँगस्ट २०२५ पर्यंत दाेन दिवसीय झालेल्या या १४ वर्षिय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विविध रेटेड प्लेयर्स सहभागी झाले होते. समर्थ ने ५ झणाचा पराभव करीत अव्वल स्थान पटकावले. स्वत: १६०० मानांकन प्राप्त करण्यासाठी समर्थ ने भरपूर मेहनत घेतली आहे. यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स चा अकरा वर्षीय ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ चा खेळाडू मास्टर समर्थ अविनाश मसराम ईयत्ता ६ वी मध्ये आहे. अगदी लहान वयाचा समर्थ याने ११ वर्षातच पदार्पण करीत खेळाडूंमध्ये पहीला क्रमांक प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपली पाञता सिद्ध केली. याआधी सूद्धा विविध स्पर्धेत मानांकन वाढवून विजेतेपद प्राप्त केलेले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सन्माननीय सचिव माेहन केळापूरे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक घनश्यामजी राठोड यांच्या हस्ते त्याचे स्वागत करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून तो एकमेव खेळाडू होता जो सर्वात लहान वयाचा हाेता. आपल्या यशाचे श्रेय तो त्याचे शालेय प्रशिक्षक अभिजीत पवार, शाळेच्या प्राचार्या रीना काळे मॅम, उपप्राचार्य जागृती गंडेचा मॅम, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे तसेच सुपरवायझर सायली कशाळकर मॅम आणि क्रीडाशिक्षक प्रमुख संजय काेल्हे, पंकज शेलाेटकर, महेश गहूकार, राेशना घूरडे, हर्षा ईंगळे व त्याचा मोठा भाऊ राम मसराम आणि आई वडील व श्रीराम बुद्धिबळ अँकडमी यवतमाळ चे संचालक प्रा.अविनाश मसराम यांना देतो.