Home विदर्भ “रस्त्यात ‘विकास” खड्ड्यास्वरूपात डोकावतोयं

“रस्त्यात ‘विकास” खड्ड्यास्वरूपात डोकावतोयं

312

रुपेश देशमुख ब्रह्मपुरी

ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचे शहर आहे. हे शहर जिल्ह्यात अतिशय शांत शहर म्हणून ओळख असलेले हे शहर, जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर वसले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, परिसरात शिक्षणाचे माहेरघर आणि आरोग्य नगरी अशी ब्रम्हपुरी शहराची ओळख आहे.
खनिज संपत्ती ने नटलेला
म्हणून ब्रह्मपुरी तालुक्याची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या तालुक्याला मंत्री झाले मात्र आजही हा ब्रह्मपुरी तालुका उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा तालुक्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.
शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे.

हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब..

राजाभाऊ खोब्रागडे चौक आंबेडकर कॉलेज पर्यंत असे अनेक मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.

जनतेमध्ये हिंमत कधी येणार?
ब्रह्मपुरीतील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे की पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र ब्रह्मपुरीतील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.
म्हणून म्हणतात ना राव ५०० व १००० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे… अशी अवस्था आपल्या ब्रह्मपुरी तालुक्याची झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडतात, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक रुपयाचा फरक पडत नाही.