
उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत असणारे शिवसैनिक हे निष्ठावंत शिवसैनिक असून यांच्यास एकीच्या बळामुळे इथल्या प्रस्थापितांनी सत्ता उपभोगली आहे, आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष सोडून बेईमानी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जनता थारा देत नाही हा इतिहास आहे.आज या ठिकाणी जमलेले शिवसैनिक पाहून मला याचा ठाम विश्वास आहे की नेरची स्थानिक सत्ता ही उबाठा कडेच राहील. ती खेचून आणण्याची ताकद इथल्या प्रत्येक शिवसैनिकात आहे त्यांच्या निष्ठेत आहे.असे प्रतिपादन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री संजय उत्तमराव देशमुख यांनी केले.
स्थानिक विश्राम भवनामध्ये शिवसैनिकांच्या सभेमला ते संबोधित करित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गद्दारीचे केंद्रबिंदू याच ठिकाणी आहे ते उध्वस्त केल्याशिवाय आपण काही स्वस्थ बसणार नाही. स्थानिक नेत्याचा मताचा घसरता आलेख पाहता आता त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेषआहे.असेही ते म्हणाले.
सामान्य माणसाचा विकास करण्यासाठी कामगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी, संजय देशमुख तुमच्या पाठीशी आहे यावर ठाम विश्वास ठेवा. असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला .
यावेळी सहकार नेते बाबू पाटील जैत, यांच्या सह शिवसेना उबाठागटाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.












































