Home विदर्भ महसूल सप्ताहात अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप

महसूल सप्ताहात अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप

264

प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न-

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी

चंद्रपूर – राज्यात साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत आज दिनांक २/८/२०१५ रोजी ब्रह्मपुरी येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. शासनाच्या मालकीच्या जमिनीवर सन २०११ पूर्वी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून कले वास्तव्यास असलेल्या आणि नियमांनुसार पात्र असलेल्या कुटुंबांना त्यांच्या अतिक्रमित जागांचे -पट्टे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी पर्वणी पाटील

महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास प्रांत अधिकारी पर्वणी पाटील ,नायक तहसीलदार लीना बोबाटे, प्रभारी नायक तहसीलदार आशिष तालेवार, आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लाभार्थी कुटुंबांनी या निर्णयाचे स्वागत करीत शानानाच्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘गृहस्वामित्व’ मिळाल्याने त्यांना स्थीर्य व सामाजिक न्याय मिळाला असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे शासनाने समाजातील वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला असून, हा निर्णय ‘समावेशक विकासा’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.