
ऐजाज़ खान
अमरावती – आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण, जिथे प्रेमसंबंधाच्या आडून महिलेला फसवून, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
ही संपूर्ण कारवाई अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
ही घटना आहे शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा भागातील. दिनांक १० जुलै २०२५ रोजी, एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचा मानसिक छळ करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली.
आरोपीचे नाव आहे अनिल ब्रम्हकुमार जोंधळे, वय ३५, राहणार वर्धा जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील मखनी.
महिलेशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर मानसिक ताण निर्माण केला जात होता. पीडित महिलेने या त्रासाला कंटाळून थेट पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र वाघ आणि पोलीस अधीक्षक श्री. शंकरकुमार कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ तपास सुरू केला.
या तपासात असे उघडकीस आले की, आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार त्रास दिला. एवढेच नाही, तर तो महिलेला व्हिडिओ कॉलवर त्रास देत असल्याचीही माहिती मिळाली.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी अनिल जोंधळे याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला जेरबंद केले.
शेवटी, ११ जुलै रोजी रात्री दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने त्याला बांबर्डा फाटा येथे खास पथक पाठवून ताब्यात घेतलं.
या प्रकरणी शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(एन), ३२८, ३५४(ब), ५०६ सह २१२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप तंवर, आणि त्यांच्या टीमने मोलाची भूमिका बजावली
ही कारवाई पोलिसांचं सजगतेचं उत्तम उदाहरण ठरली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर पोलिसांनी घेतलेली ही तत्पर आणि कठोर भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे.











































