Home महत्वाची बातमी पद्मश्री सुभाष शर्मा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार नितीन पखाले यांचा सन्मान

पद्मश्री सुभाष शर्मा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार नितीन पखाले यांचा सन्मान

473

यवतमाळचे भूषण असलेले सुभाषजी शर्मा यांनी सेंद्रिय शेतीची कास धरून जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना विषमुक्त पिकांचे उत्पादन घेण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने यावर्षी ‘पद्मश्री’ सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला. रविवारी आमच्या पृथ्वीराज नगरात ज्योती कॅन्सर रिलीफच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठीपद्मश्री सुभाषजी शर्मा आले असताना, ते थेट घरी आले. त्यावेळी मी बाहेर गेलो होतो. घरी आल्यावर चक्क पद्मश्री घरात बसून असल्याचे बघून आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्यासोबत आपल्या असीम सेवेने लौकिक प्राप्त नंददीपचे संदीप शिंदे, मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम, आर्णीचे संचालक खुशाल नागपुरे हे सुद्धा घरी आलेले बघून आनंद झाला. ज्या घरात आई, वडिलांनी सामाजिक ऋण फेडण्याचे संस्कार रुजवले त्या घरात सामाजिक कार्यातील अग्रणीनी भेट द्यावी, बैठक व्हावी हा योगायोग नव्हे, तर त्या संस्कारांचे फळ आहे. चहापानानंतर ज्योती कॅन्सर रिलीफचे सतीश मुस्कुंदे यांच्या घरी झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात पद्मश्री सुभाष शर्मा यांच्या हस्ते पत्रकारितेत सामाजिक लिखाणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माझा सन्मान झाला, हा क्षण गौरवास्पद होता. आपल्या लेखणीचा समाजासाठी, सामाजिक संस्थांच्या उत्थानासाठी सकारात्मक उपयोग होत आहे, याची हा सन्मान पावती होय…