Home अमरावती आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी केली अग्निशमन विभागाची पाहणी

आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी केली अग्निशमन विभागाची पाहणी

266

 मनिष गुडधे अमरावती
महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सोमवार दिनांक ३० जुन,२०२५ रोजी अग्निशमन विभागाची पाहणी केली.

यावेळी आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी अग्निशमन विभागाची पाहणी करतांना निर्देश दिले की, सीसीटीव्‍ही लावण्‍यात यावे. अग्निशमन विभाग हे अद्यावत असणे आवश्‍यक असून संपुर्ण विभाग संगणीकरण करण्‍याचे काम करावे. अग्निशमन विभागाने सर्व अत्‍यावश्‍यक सेवेसह सज्‍ज असणे गरजेचे आहे.
.
अग्निशमन विभागाने आलेल्‍या सर्व कॉलचा डाटा तयार करावा. अग्निशमन विभागाचे फलक तयार करुन विभागाचा मुख्‍य ठिकाणी लावावे. अग्निशमन विभागाने समन्‍वयाने काम करुन आपली जबाबदारी पुर्ण करावी. सदर विभागाचे व परिसराचे नियोजन व्‍यवस्थित करावे.