Home यवतमाळ यवतमाळ शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था : नातेवाईकांना पावसात, थंडीत उघड्यावर झोपण्याची वेळ;...

यवतमाळ शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था : नातेवाईकांना पावसात, थंडीत उघड्यावर झोपण्याची वेळ; औषधांसाठीही बाहेरची धावपळ!

347

यवतमाळ : श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे केवळ यवतमाळ जिल्ह्याचे नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातीलही रुग्णांसाठी एक मोठं आरोग्यसेवा केंद्र आहे. मात्र या रुग्णालयातील व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत असून रुग्णांच्या नातेवाईकांना हलाखीच्या परिस्थितीत रात्र काढावी लागत आहे.

पूर्वी रुग्णालयात नातेवाईकांच्या विश्रांतीसाठी एक हॉल उपलब्ध होता. पण आज त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. पावसाळा सुरू असून थंडीही जाणवू लागली असताना, रुग्णांचे नातेवाईक वरंड्यात किंवा उघड्यावर झोपायला मजबूर झाले आहेत. ही परिस्थिती जिल्ह्यातील आरोग्यसेवेची शोकांतिका दर्शवते.
या प्रश्नाकडे रुग्णालय प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. असा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे. त्यांनी अधिष्ठातांना थेट विचारले – “नातेवाईकांची विश्रांतीसाठी व्यवस्था कुठे आहे?”

याच पार्श्वभूमीवर संघातर्फे ट्रिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये आणखी एक गंभीर बाब समोर आली की, रुग्णालयात रुग्णांना २४ तास आवश्यक औषधे मिळत नाहीत. परिणामी, नातेवाईकांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात, ज्यामुळे आर्थिक भारही मोठा येतो.
या विविध तक्रारी असूनही रुग्णालय अधिष्ठातांचे याकडे दुर्लक्ष सुरूच आहे. यामुळे “नागरिकांच्या आरोग्याशी अधिष्ठातांचा काही संबंध उरलेला आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.