
यवतमाळ : कळंब तालुक्यातील सविता वडतकर या कळंब येथील रहिवाशी असून त्याच परिसरात रहिवाशी प्रेम अरुण साखळकर या इसमाविरोधात जीवे मारण्याच्या धमक्यांसह विविध गुन्ह्यांची तक्रार दाखल केली असतानाही, संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडित कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी आजाद मैदान, यवतमाळ येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाला दोन दिवस झाले आहे.
दिनांक 20 जुलै 2024 रोजी NCR No. 0591/2024 नुसार प्रेम साखळकर याने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र,घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता NCR दाखल करून आरोपीस अभय देण्यात आले आहे.तसेच
पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत FIR दाखल असूनही कोणतीही कार्यवाही केली नाही, असा गंभीर आरोप पीडिताने केला आहे.
या निष्क्रियतेमुळे आरोपी अधिकच धिटाईने वागत असून 17 फेब्रुवारी 2025 रोजी पीडिताच्या मुलावर बोलेरो गाडीने कट मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने मौन बाळगले आहे. इतकेच नव्हे, तर पीडितावर वारंवार धमक्या, मारहाण, विनयभंग व घरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवणे यांसारख्या गंभीर प्रकार घडत असून पोलीस या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत.
आरोपी हा पैशाने धनाढ्य असल्याने पोलिसाशी संगनमत करून व आर्थिक वेव्हार करून हे प्रकरण दडपण्याचे काम पोलिस करीत आहे.त्यामुळे
“आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने जर वेळेत कारवाई केली असती, तर आज परिस्थिती एवढी गंभीर झाली नसती. आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही १६ जून २०२५ पासून यवतमाळमधील आजाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहोत,” असा स्पष्ट इशारा पीडिताने दिला आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.












































