
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुख मा. प्रवीण भाऊ शिंदे यांची नागपूर विभागीय रेल्वे वापर कर्ते सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. ही निवड यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांच्या शिफारशीने केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधा, वेळापत्रक, गाड्यांची संख्या प्लॅटफॉर्म सुविधा, रेल्वे स्थानक व्यवस्थापन, स्थानिक सुविधा यावर नियंत्रण ठेवून रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम करण्याचे कार्य ही समिती करीत असते.
प्रवीण भाऊ शिंदे एक झुंजार शिवसैनिक लढाऊ बाण्याचे नेतृत्व म्हणून सर्व दूरपरिचित आहेत. ते या समिती द्वारे रेल्वे प्रशासनात क्रांतीकारक बदल घडून आणतील याचा ठाम विश्वास आहे.
जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाची ओळख. जिल्ह्याला करून दिली. पांगरी सारख्या छोट्याशा गावातून आलेले प्रवीण भाऊ शिंदे. सामान्यजनात अत्यंत लोकप्रिय आहे.
त्यांच्या निवडीचे श्रेय त्यांनी खासदार संजय भाऊ देशमुख यांना दिले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












































