
YAVATMAl – जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रेमंड युको डेनिम प्रा. ली . यवतमाळ येथे दि. 14/06/2025 रोजी भव्य रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबीरामध्ये 103 रक्त दात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवीला.
यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम ली. यांनी आपल्या शहराला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला आहे. सोबतच सामाजिक दाईत्वाचे भान ठेवून दर 4 महिन्यांनी रक्त दान शिबिर आयोजित करत आहे. सदर कार्य शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारा करिता दाखल होणाऱ्या थालेसेमिया , सिकलसेल , प्रसूती तसेच अपघात ग्रस्त रुग्णास रक्त रुपी जीवनदान देण्यास मोलाचे योगदान ठरले आहे. निस्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ आणि रेमंड युको डेनिम ली. यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्त दान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विकासजी मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रेमंड युको डेनिम ली. यवतमाळ चे कार्य निर्देशक श्री.नितीनजी श्रीवास्तव साहेब यांनी रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या रक्त दान शिबीरामध्ये अनेक कर्मचाऱ्या सोबतच अधिकाऱ्यांनी पण रक्तदान केले. सदर शिबिराचे यशस्वीते करिता रेमंड युको डेनिम ली. यवतमाळ तर्फे श्री पातुरकर सर, श्री चांडक सर, जयवीर राठोड, मयुर काळे, नीलेश कोरे, निलेश जगताप तसेच अनेक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर निस्वार्थ सेवा फाउंडेशन तर्फे परशुराम कडू, अनिकेत नवरे, किशोर बाभूळकर, करण गेडाम आणि समस्थ निस्वार्थ टीम ने परिश्रम घेतले. तसेच रक्त संकलन करणे करिता श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाची रक्त संकलन चमू यांनी विशेष योगदान दिले.












































