
यवतमाळ नगर परिषद शाळेतील विद्यार्थी व शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याधिकारी मा. शुभम क्यातमवार यांचे मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांचे संकल्पनेतून सप्ततारांकित शाळा उपक्रमाचे उद्घाटन सोहळा दिनांक 13 जून 2025 ला सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते नगर भवन येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ.प्रशांत गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ उपस्थित होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रकाश मिश्रा शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.यवतमाळ, मा. किशोर पागोरे शिक्षणाधिकारी (योजना) तथा माध्यमिक जि.प.यवतमाळ, मा.राजेय साबळे, नगररचनाकार न.प.यवतमाळ मा.सुरेख आराख,लेखापरीक्षक न.प.यवतमाळ मा.राकेश भोयर,कार्यालय अधीक्षक न.प.यवतमाळ मा.नीता गावंडे उपशिक्षणाधिकारी जि.प.यवतमाळ, मा. राजु मडावी उप शिक्षणाधिकारी जि.प.यवतमाळ, मा.प्रिया थूल न.प. यवतमाळ,मा.स्मिता घावडे विस्तार अधिकारी जि.प.यवतमाळ, मा.आनंद कसंबे दूरध्वनी प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी सप्ततारांकित शाळेचा लोगो मान्यवरांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला.यावेळी डॉ. प्रशांत गावंडे,मा.किशोर पागोरे, मा.प्रकाश मिश्रा, मा.शुभम क्यातमवार, मा. राजेय साबळे, मा.नीता गावंडे, मा.राजू मडावी, मा.स्मिता घावडे यांनी मार्गदर्शन केले.सप्त तारांकित शाळा उपक्रम यवतमाळ नगर परिषदेच्या सर्व शाळामध्ये वर्षभर राबविला जाणार आहे. गुणवत्ता, स्वच्छता,डिजिटल, नाविन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षा, शालेय अभिलेख इत्यादी निकषांच्या आधारावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांना प्रथम क्रमांक दहा लाख रुपये, द्वितीय क्रमांक पाच लाख रुपये, तृतीय क्रमांक तीन लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.सप्ततारांकित शाळा उपक्रमामुळे सर्वच शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शाळेतील विद्यार्थी व शाळांचा सर्वांगीण विकास साधणार आहे. सप्ततारांकित शाळा उद्घाटन सोहळ्याकरिता सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी देशकर व सोनाली निकडे यांनी तर प्रास्ताविक प्रशासन अधिकारी डॉ.शिल्पा पोलपेल्लीवर यांनी केले. आभार डॉ.विनोद डवले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विलास काळे, मेनकुदळे,लक्ष्मीकांत कांबळे, सौ.करुणा खैरे, संजय चुनारकर,अनिल चुटे,पंतीलाल साबळे, नितीन भोकरे, प्राजक्ता बापट सर्व मुख्याध्यापक,शिक्षक यांनी प्रयत्न केले.












































