Home यवतमाळ घाटंजी येथे पार पडला वटवृक्षाचा आगळा वेगळा विवाह सोहळा..

घाटंजी येथे पार पडला वटवृक्षाचा आगळा वेगळा विवाह सोहळा..

787

जगदंबा नगरीतील राघमवार परिवाराची संकल्पना.

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) –  झाडाचं लग्न”एक अप्रतिम कल्पना..हिंदू संस्कृतीचा नायाब नमुना.. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे… जगदंबा नगरी घाटंजी येथील प्रविण राघमवार आणि साधना प्रविण राघमवार हे आपल्या मुलीच्या वाढदिवसा निमित्य एक वटवृक्ष लावतात. त्याचे उत्तम संगोपन लेकरा प्रमाणे करतात एवढंच नाही तर त्या झाडाचं पितृत्व स्विकारून वयात आल्यानंतर त्या झाडाचं लग्नही करून देतात. निसर्गा सोबत एवढं समरस होतांना जो आनंद त्यांना होत असेल तो शब्दात वर्णनही करण्याजोगे नाही.यातच त्यांनी एक दृढ नातं निर्माण करण्याच्या दृष्टीने व समाजाला एक चांगला संदेश पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून चक्क त्या झाडाचे पितृत्व स्विकारून त्या झाडाचे लग्न ही लावून देतात. तोच एक घाटंजीतील जगदंबा नगरीत एक आगळा वेगळा विवाह सोहळा विधिवत संपन्न झाला.
दिवसेंदिवस वाढते तापमान निसर्गाची अवकृपा याची जाण ठेवून आघमवार परिवार वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेत असतात.याबाबीची जनजागृती व्हावीत प्रत्येकाने वृक्षारोपण करावेत व आपण वटवृक्षाचे काही देणे लागतो. त्यांचा मोलाचा आधार आपणास मिळतो यासाठी त्यांनी वटवृक्षाची विधिवत पूजन करून विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके आणि कर्मचारी तसेच विजय विरदंडे, नंदकिशोर डंभारे( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ) ॲड. कोमावार ,बच्चुवार,संजय तुरक ( सेवा निवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक) गुलाबराव सिसले ,श्रीधर येरावार,बंडू गावंडे मानकर उपस्थित होते.या वेळी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना माझा परिसर – माझी जबाबदारी हे ब्रिद जर सर्वांनी मिळून जोपासले गेले तर निश्चितच एक वेगळी ओळख जिल्हयात निर्माण होईल . प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी स्विकारावी. निधीची कमतरता पडणार नाही असे मत मुख्याधिकारी राजू घोडके यांनी व्यक्त केले .या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा घाटंजी शहरासह परिसरात होत आहे.