Home यवतमाळ विदर्भातील भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर

विदर्भातील भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर

376

मोजणीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्याकरिता 26 मे पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे अमरावती नागपूर विभागातील विदर्भ भूमी अभिलेख मोठ्या संख्येने कर्मचारी संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने संपात सहभागी झाल्यामुळे दोन्ही विभागातील भूमि अभिलेख खात्यातील मोजणी व अन्य कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत संपाचा आजचा पहिला दिवस असून कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत याच मागणीकरिता भूमी अभिलेख पुणे विभागाने 15 मे पासून पुणे विभागातील कामकाज पूर्ण ठप्प झालेले आहे तीच परिस्थिती अमरावती नागपूर विभागात निर्माण झालेली आहे शासनाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी नेते श्रीराम खिरेकर यांनी शासनाकडे केली आहे शासनाने पुणे विभागातील बेमुदत संपाकडे अद्याप पर्यंत अद्याप पर्यंत लक्ष न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असून विदर्भा बरोबरच मुंबई नाशिक औरंगाबाद विभागातील कर्मचारी सुद्धा लवकरच बेमुदत संपात भागीदारी करतील असा विश्वास कर्मचारी नेते श्रीराम खिरेकर यांनी व्यक्त केला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून कर्मचारी मोठ्या संख्येने बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत शासनाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतनश्रेणी करता नेमलेली सुधांशू कमिटीचा अहवाल तात्काळ स्वीकृत करून कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी कारण शासनाने तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न सोडविण्याकरिता भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या सेवा भरती नियमात सन 2012 पासून दुरुस्ती केली असून तांत्रिक पात्रता लागू केली असून आता भूमी अभिलेख खात्यात सर्वे पदावर बी ई सिव्हील तसेच सिव्हील डिप्लोमा घेतलेले इंजिनियर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनतेची अडवणूक होऊ नये म्हणून विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने शासनाला यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन शांतता मार्गाने मागण्याकडे लक्ष वेधले आहे परंतु शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेला नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावे लागत आहे या संपाला भूमी अभिलेख राजपत्रित अधिकारी संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी दिली याप्रसंगी सर्वश्री प्रवीण लाकडे श्री सिद्धेश्वर सारडे अंजू बोपचे चेतना राऊत संदीप विशंभरे विनोद फौजदार सचिन उत्तरवार नीरज चटके राजेंद्र चणेवार आदी कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.