
वर्धा – आर्वी येथील राजकारण सध्या जास्तच तापलेलं दिसत आहे आणि त्यातच राजकारणापेक्षा जास्त अपघातात गंभीर झालेल्या त्या तरुणाची जास्त चर्चा सध्या आर्वी विधानसभा क्षेत्रात होऊ लागली आहे, नेमकं हे अपघात प्रकरण आहे तरी काय आणि अपघातात गंभीर झालेला जखमी तरुण आहे तरी कोण जाणून घेऊया पोलिस वाला डॉट कॉम याच्या माध्यमातून…
दिनांक 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास एका हॉटेल मधून जेवण करून आपल्या घरी परत येत असताना पुलगाव रोड जवळील प्लायवूड फॅक्टरी समोर एक लाल रंगाच्या चार चाकी ने तरुण हुसेफा बोहरा याच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली व त्यात हा तरुण गंभीर रित्या जखमी झाला साधारण कुटुंबात जन्म घेतलेला या तरुणाला सध्या आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये एक माफीया असं नाव देण्यात आलं व त्याची व त्याच्या परिवाराची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे….
दिनांक 14 मे रोजी अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणांनी दिनांक 16 मे रोजी आर्वी पोलीस स्टेशन गाठलं व आर्वी येथे अपघात प्रकरणात आर्वी येथील तीन प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावासह पोलीस स्टेशन आर्वी येथे लेखी तक्रार नोंदविली सदर तक्रारीत स्पष्टपणे नमूद होते की माझ्या अपघाताच्या मागे आर्वी येथील या तीन व्यक्तींचा समावेश असू शकतो व मला माझ्या जीवाला भविष्यात काही हानी झाल्यास या तीन व्यक्तींना जबाबदार ठरवण्यात यावं अत्यंत शांत व निर्मळ स्वभावाचा हा तरुण एक फर्निचर व्यापारी आहे व यांच्यावर कुठल्याही गुन्ह्याशी संबंध आतापर्यंत तर दिसून येत नाही मग काय आहे या अपघात या मागची सत्यता यावर सध्या एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे…
अचानक झालेला अपघात व सदर अपघाताची तक्रार देण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गेला असता तेथे जमलेले वीस ते पंचवीस गुंड प्रवृत्तीचे लोक हे पाहून तणावत असलेला हा तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे….











































