Home विदर्भ अपघातातील गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाला न्याय मिळणार का?

अपघातातील गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाला न्याय मिळणार का?

612

वर्धा – आर्वी येथिल विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांनी काही साथीदाराच्या माध्यमातून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे स्पष्ट नमुद करून आर्वी येथिल फर्निचर व्यापारी हुजेफा बोहरा यांनी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र अद्यापही ही कारवाई गुलदस्त्यात असल्याचे चित्र समोर येत आहे

दोन आमदार आणि एक खासदार लाभलेल्या आर्वी शहरातल्या एका निर्दोष तरुणाला न्याय मिळून तरी देणार कोण यावर सर्व विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे…
सदर तरुण हा दिनांक १६ मे रोजी विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे व आर्वी येथील दोन नामांकित युवकांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्याकरिता गेला असता त्याच्या मागे वीस ते पंचवीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस स्टेशन पर्यंत त्याचा पाठलाग केला असेही तो तरुण सांगतात वयाचे सर्व चित्रीकरण पोलीस स्टेशन येथील लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असेल असल्याचेही तो सांगतो….

सदर तरुणाने लेखी तक्रार देऊन तीन दिवस लोटूनही पोलीस प्रशासन अत्यंत सुस्त गतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे तरुण हुजेफा बोहरा यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे तीन लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे असें नमूद केले आहे, हे तिघेही आर्वी येथील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याकारणाने पोलीस प्रशासनही तरुणाने दिलेल्या या लेखी तक्रार वर कारवाई करण्यास टाळमटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे..

सदर तरुणाची मानसिक स्थिती आता खालावत चाललेली आहे व भीतीपोटी हा तरुण घराच्या बाहेर निघायला सुद्धा विचार करतोय याला न्याय मिळून देणार तरी कोण यावर सर्व विधानसभांच्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे…..