Home यवतमाळ लोही तिल जिल्हा परिषद शाळेने 10 विच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली…!

लोही तिल जिल्हा परिषद शाळेने 10 विच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली…!

747

अशोक जोगदंड
दारव्हा तालुक्यातील लोही जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लोही या शाळेने देखील वर्ग 10 वीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे.

शाळेतील एकूण 77 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 77 पैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 22 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त, 30 विद्यार्थी प्रथम श्रेणी, दवितीय श्रेणी 15 आणि 8 वि‌द्यार्थी पास अशाप्रकारे एकूण 97.40% निकाल. कु. स्वीटी भारत पवार हिने 86.20% गुण, कु. समीक्षा किशोर भोजापुरे 86.00%, कु. दिव्या विजय चंदनसे 85.60%, कु. वेदिका प्रकार जामुदे 83.60%, कु. विद्या दामोदर सुरजुसे 83.60%, कु. आरती दीपक अलाटे 82.80%, कु. पल्लवी चंद्रभान चंदनचे, कु. साक्षी विनोद लवटे, ध्वज साहेबराव तायडे 82.60% गुण प्राप्त केले. एन एम एम एस परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी मेरिट येऊन शिष्यवृत्ती मिळवण्याचा मान मिळवला विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ट्यूशन सरखी सुविधा उपलब्ध नस्ताना देखील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक जी. एम. गोडसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य गावातील नागरीक यांनी शिक्षकांचे आभार मानले असून विद्यार्थी आणि शिक्षकावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.