Home यवतमाळ भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात दोषी असलेला कारकून कारवाईपासून दूर….

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात दोषी असलेला कारकून कारवाईपासून दूर….

562

घाटंजी (प्रतिनिधी ) – अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणात सक्रिय असल्याबाबत अनेक तक्रारी होऊन सुद्धा घाटंजी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सध्या पांढरकवडा येथे कर्तव्यावर असून अनेक गंभीर प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर केले गेले असताना सुद्धा वरिष्ठांकडून प्रस्तुत कार 1 यांचेवर विशेष मेहरबानी असण्याचे कारण काय? असा सवाल महसूल वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


सविस्तर वृत्त असे की, सचिन बागडे अव्वल कारकून, केळापूर येथे सध्या कर्तव्यावर असून गेल्या वर्षभरापासून अनेक भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या तक्रारी त्यांच्यावर झालेल्या असून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई त्यांच्या विरोधात केल्या गेलेली नाही.
त्यासनुसार सचिन बागडे यांची जर चौकशी झाली तर खूप मोठे मोठे भ्रष्टाचार उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून त्यासोबत मोठमोठे कर्मचारी सुद्धा कारवाईस पात्र होऊ शकेल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सचिन बागडे यांच्यावर कारवाई होत नाही हे निश्चित होत आहे.
मौजे बिलायता, ता घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील जप्ती व पंचनामा केलेली रेती विक्री प्रकरणी, व रेती चोरी झाली असे वरिष्ठांशी संघांमत करून प्रकरण दडपल्या गेलेले आहेत त्यामधील तक्रारदार अमोल कोमावार ( व्हिसल ब्लोअर ) यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तसेच मुख्य सचिव महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे रीतसर तक्रार करून पावसाळी अधिवेशनात अशा अनेक प्रकरणात कारवाईची मागणी लावून धरलेली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन बागडे, व त्यांच्यासह घाटंजी तहसील कार्यालयात सध्या कर्तव्यावर असलेले भ्रष्टाचारी जय आणि वीरू या दोन राजपत्रित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपूर्ण भ्रष्टाचाराची मालिका उघडकिस येण्याची दाट शक्यता असून सचिन बागडे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून कारवाई तसेच पोलीस विभागाकडून कसून चौकशी करण्याची सक्त गरज असून तशी मागणी सध्या चंद्रकांत चौधरी या तक्रारदाराने तक्रारीद्वारे संबंधित विभागात केलेली आहे.