Home जळगाव आदील शाह फारूकी बहुउद्देश्यीय संस्थे तर्फे खान्देश गौरव पुरस्कारा चे वितरण

आदील शाह फारूकी बहुउद्देश्यीय संस्थे तर्फे खान्देश गौरव पुरस्कारा चे वितरण

48
0

शरीफ शेख

जळगाव , दि. ०९ :- जिल्ह्यातील अडावद तालुका चोपडा येथिल आदिलशाह फारुकी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील 35 मान्यवरांना खान्देश गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते.
यावेळी महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन अंकुर साहीत्य परिषदेचे सह सचिव हकीम चौधरी , मुक्ताईनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्था अध्यक्ष फारुख शहा नौमानी यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच सुरेश जनार्दन बोरसे , मुक्ताईनगर यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता, लेखन, काव्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्याक्ष प्रवीण पाटील, अली अंजुम रज़्वी, जावेद शेख, दिगंबर पाटील अडावद, यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात *रियाझ शेख नागपूर, नुरुद्दीन मुल्लाजी कासोदा, सुनीता अशोकराव नागपूर, फिरोज शेख जळगाव, गणेश परदेशी, हारून अन्सारी, अजमल शाह,जळगांव, असगर शाह भुसावळ, फारुख शेख जळगांव, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जाविद यावल, शेख अय्युब यावल, जुबेर शाह अडावद, रोशन शहा नशिराबाद,शेख अल्ताफ यावल, जावेद शेख पाचोरा, असिफ शहा यावल आदींनी प्रयत्न केले.
आभार संस्था अध्यक्ष फारूक शहा नौमानी यांनी व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting