Home सोलापुर देशात विकल्या जाणा-या  सर्वाधिक वस्तु बचत गटाचे –  जोशी

देशात विकल्या जाणा-या  सर्वाधिक वस्तु बचत गटाचे –  जोशी

24
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०९ :- देशात विकल्या जाणा-या वस्तु हे बचत गटातील भगिनीनी तयार केलेले आहे.त्या मुळे या वस्तुला जागतीक बाजारात देखील वाढती मागणी असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.

वागदरी येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र सोलापूर व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला व युवा मंडळ विकास अभियान कार्यक्रमात जोशी बोलत होते . प्रारंभी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पाहुण्याचे हस्ते झाले. या कार्यक्रमाचे उध्दघाटन अक्कलकोट पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते श्रीशैल ठोबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्र सोलापूर जिल्हा समन्वयक अजित कुमार पंचायत समिती सदस्य गुडांप्पा पोमाजी, उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, उपस्थित होते.
या वेळी बोलताना जोशी म्हणाले की , महिला बचत गटाच्या माध्यमातून जगामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वस्तू महिला बचत गट करत असते, त्यातुन रोजगार निर्मिती होऊ शकते, त्या साठी महिला बचत गटानी स्वावलंबन जीवन जगण्यासाठी नवनविन व्यवसाय करण्यासाठी वळावे . असे मत व्यक्त केले, यावेळी प्रमुख वक्ते प्रतिक दनाळे बॅंक ऑफ इंडिया चपळगाव यांनी सांगितले की, बॅंक महिलांना व्याज कसे देते बॅंकचे व्याजासकट भरणा करणारे महिला बचत गट एकमेव साधन आहे असे मत व्यक्त, केले. विकी बाबा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट बचत गटांना सन्मानपत्र देऊ गौरविण्यात आले यामध्ये राणी लक्ष्मी स्वयं सहाय्यता समुह सापळे, मिन स्वयं सहाय्यता समुह करजगी, सहेली स्वयं सहाय्यता समुह उडगी, सखी स्वयं सहाय्यता समुह उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting