
अमीन शाह
वडिलांकडून होणार्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून संतापलेल्या मुलीने चाकूने हल्ला केला. संतापलेल्या मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर हा थरार घडला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नराधम बापावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन परिसरात थरारक घटना घडली. अश्लील वर्तन केले म्हणून मुलीने बापाच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. या हल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रिती शुक्ला (२४) असे या हल्लेखोर तरुणीचे नाव आहे. प्रितीच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील विजय शुक्ला हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे तिने संतापून चाकूने हल्ला केला आणि त्यांचे गुप्तांग कापून टाकले. या हल्ल्यानंतर विजय शुक्ला याने बचावासाठी घराबाहेर धाव घेतली होती. तिने रस्त्यात गाठून त्यांच्यावर चाकूने स्पा सप वार केले. हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीची व्हिडियो देखील स्थानिकांना काढला आहे. या प्रकरणी सध्या तुळींज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संतोष भुवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वोदय नगर चाळीत आरोपी बाप आणि मुलगी राहतात. सावत्र बाप गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होत. संतापलेल्या मुलीने सावत्र बापाचे भर रस्यावर चाकूने गुप्तांग कापले. रस्त्यावर खुनी थरार झाला. बघता बघता बघ्यांची गर्दी वाढली. जमावाने मुलीला शांत करत चाकू फेकायला लावले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मुलीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.












































