Home जळगाव सासऱ्याची वाईट नजर सुनेवर फिरली अन , विपरितच घडले ,

सासऱ्याची वाईट नजर सुनेवर फिरली अन , विपरितच घडले ,

652

 

पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना ,

अमीन शाह

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावामध्ये
३२ वर्षीय विवाहितेवर तिच्या ५६ वर्षीय सासऱ्याने वेळोवेळी चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याबद्दल यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर पीडित महिला सध्या अकोला जिल्ह्यात राहत आहे. यावल तालुक्यातील एका गावामध्ये सदर पीडित विवाहितेवर दि. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान वेळोवेळी ५६ वर्षीय सासऱ्याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले व जीवे मारण्याचे धमकी दिली. यावरून यावल पोलीस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.