Home महत्वाची बातमी तंबाकू दिली नाही म्हणून त्याला ठार मारून टाकले

तंबाकू दिली नाही म्हणून त्याला ठार मारून टाकले

234

 

मारेकऱ्यास अटक ,

अमीन शाह

लातूर :
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्याच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला 13 मार्चला मध्यरात्री ही घटना घडली. तंबाखू देण्या-घेण्याच्या वादातून दिवसा दोघांमध्ये भांडण झाले आणि रात्री त्या रागातून हा खून झाला असा तर्क पोलिसांनी लावला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबविली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटविली. त्यानंतर आरोपी देविदास शेषराव सोनकांबळे, (वय 54 वर्ष, राहणार खाडगाव रोड, प्रकाश नगर, चंद्रोदय कॉलनी, रोड क्रमांक 5, लातूर) या आरोपीला क्रीडा संकुलच्या गेट समोरून 14 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जेरबंद केले. देविदास सोनकांबळे हा दिवसभर भीक मागून खातो. दुपारी तंबाखू घेण्या-देण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून मध्यरात्री चहाच्या टपरीसमोर फुटपाथवर झोपलेल्या प्रकाश लिंबाजी भडके (58, रा. खाडगाव रोड, लातूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने कबूल केले असे पोलिसांनी एका पत्रकात म्हटले आहे. केवळ तंबाखू साठी त्याने एका निष्पाप वयक्तीचा खून केला त्यामुळे शहरात आश्चर्य वयकत केले जात आहे ,

.