Home बुलडाणा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान श्री.आनंदस्वामी महाराज शिवणी आरमाळ

भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान श्री.आनंदस्वामी महाराज शिवणी आरमाळ

215

प्रतिनिधी – रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही :-श्री.आनंद स्वामी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ग्राम शिवणी आरमाळ गावात श्री.


आनंद स्वामी महाराज पुण्यतिथी व महाशिवरात्री निमित्त अनादी काळापासून भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताह चालू आहे. या हरिनाम सप्ताहाला गुरुवर्य कै.देवपुरी महाराज व ह. भ.प.कै.एकनाथ महाराज गरुड यांच्या मार्गदर्शन व सहवास लाभला आहे.पुरातन काळापासून कपिला नदीच्या काठावर वसलेले हे पंचमुखी महादेवाचे जागृत ठिकाण असून इथेच बाजूला श्री.आनंदस्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे.गावचे ग्रामदैवत श्री.आनंद स्वामी महाराज हे सर्वांच्या गुरुस्थानी असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे व दुःख हरणारे आहे. गुरु महाराज यांच्याकडे भक्ती भावाने केलेली विनवणी ही निश्चितपणे गुरू महाराज पूर्ण करतात.असा अनुभव अनेक भक्तांना आलेले आहे.या वर्षीचा हरिनाम सप्ताह हा शासनाचा ब दर्जा प्राप्त श्री.आनंद स्वामी महाराज देवस्थान समिती यांच्या नियोजना खाली दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ ते ३ मार्च २०२५ पर्यंत असून दिनांक ३ मार्च २०२५ रोज सोमवारला महाप्रसाद व यात्रा राहणार असून या दिवशी काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री.अनंत विभुषित श्री श्री श्री.१००८ महा मंडलेश्वर श्री.श्रीकृष्ण चैतन्यपुरी महाराज निळकंठेश्वर संस्थान मंठा यांचे होणार आहे.या हरिनाम सप्ताहाला शिवणी आरमाळ गावात सर्वात मोठा सण दिवाळीपेक्षा ही जास्त महत्त्व आहे.कारण या सप्ताहाला गावातील सर्व लेकीबाळी , गावातील वेगवेगळ्या प्रयोजनासाठी विस्थापित झालेले सर्व नागरिक सहपरिवार गुरू महाराज यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी व मनोइच्छीत पूर्ण करण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतात.
या हरिनाम सप्ताहाचे वैशिष्ट म्हणजे हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज ५ दिवस संध्याकाळी संपूर्ण गावाला होणारे अन्नदान. हे अन्नदान करण्यासाठी गावात ५ दिवस पंगतीची जबाबदारी हे सर्वांनी समूहात वाटून घेतलेली असून त्यासाठी सर्वजण आपापल्या परीने सहकार्य करतात.विशेष करून गावातील महिला ह्या आवर्जून ५ दिवस प्रत्येकी १ पायलीच्या पोळ्या करून योगदान देतात.या तयार केलेल्या पोळ्या ह्या ज्या वृक्षाचे आयुर्मान कुणालाच माहिती नाही अश्या, आपल्या महाकाय रूपाने सुरक्षेची हमी व भक्तांवर शितलतेची छाया धरणाऱ्या वटवृक्षाच्या खोडामध्ये साठविल्या जातात.या अन्नदाना
तून भक्तांच्या भुकेची व हरिकिर्तनातून पारमार्थिक सुखाची तृप्ती होते. हा हरिनाम सप्ताहाच्या महाप्रसाद व यात्रेच्या निमित्ताने पंच क्रोशितील भाविक भक्त हे गुरू महाराज श्री.आनंदस्वामी महाराज यांचे व पंचमुखी महादेव यांचे दर्शन घेण्यासाठी येतात.या हरिनाम सप्ताहामध्ये गावातील लहान मुलेमुली,महिला भगिनी,पुरुष मंडळी हे गुरू महाराजांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. महाशिवरात्री निमित्त होणारा हा हरिनाम सप्ताह भक्ती शक्तीची उपासना करणाऱ्या हरिभक्तांसाठी प्रापंचिक जीवनातील सुख दुःख बाजूला सारून देहभान विसरून भगवंताशी एकरूप होण्याची एक पर्वणीच आहे.