Home यवतमाळ सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय तुरक यांचा सत्कार सोहळा..

सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय तुरक यांचा सत्कार सोहळा..

530

घाटंजी (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील यरंडगाव येथिल उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय तुरक दिनांक २८ फेब्रुवारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने केन्द्र शाळा यरंडगाव केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षकांनी सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून देवून विद्यार्थी प्रिय,नानाविध उपक्रमाच्या माध्यमातून आपले नाव जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरणारे विविध प्रकारचे सोळा परितोषीकानी सन्मानित झालेले, दप्तर मुक्त विद्यार्थी संकलपणा मनाशी बाळगून प्रत्यक्षात आचरणात आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी करणारे माजी प्रभारी केन्द्र प्रमुख तथा उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय तुरक यांच्या कार्याची प्रेरणा लाभत रहावी व त्यांनी आपल्या सेवेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येवून त्यांचा मोठ्या थाटात भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहुउद्देशिय संस्थेकडून राजू चव्हाण, दिनेश गाऊत्रे,रमेश मादस्तवार यांनी सुद्धा शाल श्रीफळ देऊन गौरव केला. या कार्यक्रमात अनेकांनी आपल्या मनोगतात सत्कारमूर्ती संजय तुरक यांच्या सेवा कार्यकाळावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गुण गौरव करीत अनेक जुन्या आठवणींना व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला उजाळा दिला. सत्कारमुर्ती म्हणून संजय तुरक यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांचा जीवनपट कथन करीत ज्यांचे ज्यांचे त्यांना सहकार्य मिळाले त्यांचे आभार मानले.त्यांच्या मनोगताने उपस्थित गण भावूक झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सुधाकर वांढरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच्या दिपाली गावंडे,प्रवीण कांबळे, पारवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे, विनय भुरे, के. डी.मडावी,अमोल ठाकरे,रमेश ताटेवार, शितल ठाकरे, पत्रकार राजू चव्हाण, दिनेश गाऊत्रे,रमेश मादस्तवार,प्रकाश गावंडे, यमसनवार सर मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश उदार यांनी केले तर उत्कृष्ट सूत्र संचालन रमेश दखने, यांनी केले व आभार प्रदर्शन गजेंद्र ढवळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यरंडगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंदानी अथक परिश्रम घेतले.